कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमाकांचे विजेते

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली श्री गणेश दर्शन स्पर्धेच्या परंपरेचा वसा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवला आहे. यंदा घेण्यात आलेल्या शिवसेना ठाणे जिल्हा गणेश स्पर्धेत ‘पृथ्वी रक्षण आणि जीवन’ या विषयावर देखावा साकारलेल्या कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी जाहीर केले. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या या अभिनव स्पर्धेचे यंदाचे 30 वे वर्षे आहे. उत्सव साजरा करणाऱ्या संस्थाच्या उत्साहाला विधायक वळण मिळावे या उदात्त हेतूने आणि त्यातून समाजप्रबोधनाने हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्या या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ठाणे आणि कल्याण विभागातून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षण करताना गणेशमूर्तीची सुबकता, मांगल्य, आरास त्यातील वैविध्य, नेत्रदिपकता आणि त्यातून प्रकट होणारी आशयगर्भता आणि देखाव्यातून प्रतित होणारे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची या बाबींची दखल घेण्यात आली असल्याचे या स्पर्धेच्या परीक्षक मंडळांनी नमूद केले. या स्पर्धेत प्रथम कमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा विषय – ‘पृथ्वीरक्षण आणि जीवन’ (1 लाख), द्वितीय क्रमांक शिवसम्राट मित्र मंडळ, गांधीनगर कोपरी विषय – ‘साथीचे रोग’ ( रोख 75 हजार), तृतीय क्रमांक पोलीस मुख्यालय प्रा.शाळा श्री गणेशोत्सव मंडळ, सेंट्रल मैदान विषय – ‘पर्यावरण’ ( रोख 50 हजार), चतुर्थ क्रमांक ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर, कोपरी विषय – ‘जीवनदायी नदी’ ( रोख 25 हजार), पाचवा क्रमांक जयभवानी मित्र मंडळ, आझादनगर, जरीमरी मंदिरामागे विषय – ‘भारुडाच्या माध्यमातून विधवाप्रथा बंद जनजागृती’ ( रोख 21 हजार), सहावा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ, वॉकरवाडी विषय – ‘हस्तकला व ओरेगामी कलेतून बनविलेली पर्यावरणपूरक कलाकृती’ ( रोख 15 हजार), सातवा क्रमांक कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड विषय – ‘दोरखंडापासून बनविलेले काल्पनिक महल’ ( रोख 15 हजार), आठवा क्रमांक जनजागृती मित्र मंडळ किसननगर विषय – ‘प्रतिपंढरपूर’ ( रोख 15 हजार), नववा क्रमांक नवयुग मित्रमंडळ, पारशीवाडी कोपरी विषय – ‘शिवसृष्टी’ ( रोख 15 हजार), दहावा क्रमांक डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्यनगर, पाडा नं. 3 विषय – ‘गुहा आणि पाण्याचा झरा’ ( रोख 15 हजार) तर आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिंग उद्योगनगर ठाणे विषय – ‘काल्पनिक महल’ ( रोख 10 हजार). उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम क्रमांक श्री अष्टविनायक मित्र मंडळ, गणपतीमंदिरशेजारी, पाडा नं. 4 लोकमान्यनगर ठाणे मूर्तीकार आशिष कुचेकर, सायन मुंबई ( रोख 10 हजार), द्वितीय क्रमांक गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव, कळवा मूर्तीकार निळकंठ गोरे ( रोख 10 हजार) यांना प्राप्त झाले आहे. तर लक्षवेधी विशेष पारितोषिके सार्वजनिक उत्सव मंडळ, जयभवानीनगर विषय – ‘शिवसेना कोणाची’, प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव, मेंटल हॉस्पीटलजवळ, ठाणे विषय – ‘रुग्णांच्या मानसिक अवस्थेवर आधारित मनमंदिर देखावा’, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, श्रीरंग सोसायटी ठाणे विषय – ‘प्राचीन मंदिर’, जिज्ञासा मित्र मंडळ, दगडी शाळेसमोर चरई विषय – ‘इकाफ्रेंडली कापडी महल’ व स्नेहाकिंत मित्र मंडळ, यशआनंद सोसायटी, विष्णूनगर, ठाणे विषय – ‘काल्पनिक मंदिर’ यांची निवड झाली असून प्रत्येकी रोख रुपये 10 हजार देवून गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट सजावट ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, लेप्रसी कॉलनी, गांधीनगर, कोपरी, ठाणे पूर्व विषय – जीवनदायी नदी , सजावटकर श्री लॉरेन्स ( रोख 10 हजार). उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये सचिन 8 मित्र मंडळ, संतज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट, ओम सन्मित्र मंडळ, पडवळनगर, वागळे इस्टेट, कशिश पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कशिश पार्क, आई जीवदानी मित्रमंडळ, साईमंदिर, जोगिला मार्केट उथळसर, गोपाळ गणेश मित्र मंडळ, कॅसल मिलजवळ ठाणे, शिवसेना पुरस्कृत – सार्वजनिक उत्सव मंडळ,स्वा. सावरकर नगर, बाळ मित्र मंडळ, स्वा. सावरकर नगर, शिवसेना पुरस्कृत- सार्वजनिक मंडळ, किसन नगर,३ यांची निवड झाली असून प्रत्येकी रोख 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading