पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप

पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 11,129 गणेशमुर्तींसह 1003 गौरींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये विसर्जनाला मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 178 गणेश मुर्तींचे महापालिकेच्या वतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. काल गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी 10861 घरगुती गणेशमुर्ती, 1003 गौरी,90 सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच178 स्विकृत मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मासुंदा आणि आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी 760 घरगुती गणेश मुर्तींचे आणि 61 गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर दत्तमंदिर घाट येथे 1110 घरगुती गणेश मूर्ती आणि 87 गौरी, खारेगाव कृत्रीम तलावात 509 घरगुती गणेश मुर्ती,37 गौरी आणि 4 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निळकंठवुडस् येथे 393 घरगुती मूर्ती, 18 गौरी, आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये 333 गणेश मुर्ती 55 गौरी, रेवाळे कृत्रिम तलाव येथे 416 घरगुती गणेश मुर्ती, 7 सार्वजनिक आणि 13 गौरी, खिड़काळी तलाव येथे 106 घरगुती गणेश मुर्ती, 7 गौरी, शंकर मंदीर तलाव येथे 199 घरगुती गणेश मुर्ती, 12 सार्वजिनक गणेश मुर्ती तर 20 गौरी, उपवन तलाव येथे 1468 घरगुती गणेश मुर्ती, 12 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 69 गौरींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे 738 घरगुती गणेश मुर्ती, 11 सार्वजनिक गणेश मुर्ती , 77 गौरी आणि 178 स्वीकृत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे 273 घरगुती गणेश मूर्ती, २ सार्वजनिक गणेश मुर्ती आणि 6 गौरी तसेच गायमुख घाट २ येथे 60 घरगुती गणेश मूर्ती, 1 सार्वजनिक तर ५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे 540 घरगुती गणेश मुर्ती, २ सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 182 गौरींचे विसर्जन करण्यात आले. ठाणे पूर्वतील गौरी या भव्यदिव्य असतात. ख-या मानवाप्रमाणे या गौरी पहायला मिळतात. त्यामुळे या गौरींचं विसर्जन पाहण्यासाठीही या भागात मोठी गर्दी झाली होती. रायलादेवी घाट १ येथे 823 घरगुती गणेश मुर्ती , 116 गौरी, रायलादेवी घाट २ येथे 1038 घरगुती गणेश मुर्ती आणि 130 गौरी, कोलशेत घाट २ येथे 1006 घरगुती गणेश मुर्ती, 39 सार्वजनिक गणेश मुर्ती, 65 गौरी, रेवाळे तलाव येथे 416 घरगुती गणेश मूर्ती, 7 सार्वजनिक गणेश मूर्ती 13 गौरी, आत्माराम बालाजी घाट येथे 74 घरगुती गणेश मूर्ती आणि २ गौरी, शंकर मंदिर तलाव येथे 199 घरगुती, 12 सार्वजनिक गणेश मूर्ती आणि 20 गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे 932 घरगुती गणेश मुर्ती, 53 गौरींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेनं विसर्जनासाठी सर्व ठिकाणी स्वयंसेवक, सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात केले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading