सर्वपित्री अमावास्या अशुभ नाही – दा. कृ. सोमण

25 सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी श्रद्धेने पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा दिवस अशुभ कसा असू शकेल ? हा दिवस वाईट कसा असेल ? पितर जर भूलोकात येत असतील तर त्यांचा आशीर्वादच मिळेल ना ? पण जर जिवंतपणी त्याना त्रास दिला असेल तर मात्र ते सोडणार नाहीत. मात्र असे त्रास देणारे कमी लोक असतात. सारासार विचार केला की लक्षात येते की सर्वपित्री अमावास्या ही अशुभ नसते असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी आज स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.

Read more

जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास तातडीने टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा- रुपाली सातपुते

लंपी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले आहे.

Read more

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

कालपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मिटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे.

Read more

लम्पी त्वचारोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गुरांचा बाजार आणि शर्यती बंद

लम्पी त्वचा रोगामुळे आजपर्यंत जिल्ह्यात २६ जनावरे बाधित आढळली आहेत.

Read more

स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेत चित्रकला स्पर्धा संपन्न

स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अभियंता दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकतर्फे ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर – उद्योगमंत्री उदय सामंत

शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयलर इंडिया 2022 प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.

Read more