जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे p

जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे.

Read more

Categories ZP

जिल्हा परिषदेच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या आहेत. या भाज्या तब्येतीसाठी गुणकारक असल्याचे देखील सांगितले जाते. यामध्ये सुमारे 25 ते 30 महिला बचत गटांनी आपले स्टॉल लावले असून नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहे.

Categories ZP

जिल्हा परिषदेच्या वाहन चालकाचा मुलगा एलएलबी उत्तीर्ण झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं सन्मानित

जिल्हा परिषदेच्या एका वाहन चालकाचा मुलगा एलएलबी उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

Read more

देशात प्रथमच के तंत्रज्ञानाने रस्ता केल्यामुळे तीस लाखांची बचत

देशात पहिल्यांदाच ‘के ३१’ तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी करण्यात आली आहे. डोंगराच्या पायथ्याजवळ आणि नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात पूर्णतः पाणी साचून चिखल आणि दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून … Read more

‘क क कवितेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

जग डिजिटल ५जी च्या जगात पुढे जात असताना शालेय विद्यार्थ्यांनी चक्क कवितेचे स्वरचित पुस्तक प्रकाशन करणं म्हणजे साहित्य क्षेत्रात चिमुकल्यांनी भर पाडण्याचे मोलाचे काम केलं आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पंचायत समिती कल्याण येथिल शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी ‘क क कवितेचा’ हे पुस्तक नावा रुपास आणले. या कविता पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.

Read more

​आपले सरकार सेवा अंतर्गत NIC Application आणि  जी २ जी या सेवा निर्गतीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक

आपले सरकार सेवा अंतर्गत NIC Application आणि  जी २ जी या सेवा निर्गतीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

Read more

कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read more

खरीप हंगामासाठी कृषि विभागाकडून रासायनिक खते व भात बियाण्यांचे नियोजन

ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे आणि किटकनाशके या निविष्ठा शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत.

Read more

अन्न साखळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभाग तसंच आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने अन्न साखळी व्यवस्थापन कार्यशाळा डॉ. रुपल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

Read more