स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अभियंता दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकतर्फे ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महापालिकेचे अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शहर अभियंता प्रकाश सोनाग्रा यांच्यासह सर्व स्पर्धकांनी ठाणे आणि स्वच्छता या संकल्पनेवर आधारित चित्रे रेखाटली. दोन तास चाललेल्या या स्पर्धेने स्वच्छता अमृत महोत्सवाच्या उपक्रमांची प्रातिनिधिक सुरूवात करण्यात आली.