ठाण्याला पावसानं झोडपलं – जनजीवन विस्कळीत

ठाण्यामध्ये आज तुफान पाऊस झाला आहे. सकाळी साडेआठ पासून दुपारी 3.30 वाजेपर्यंतच्या 8 तासात 94 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर गेल्या 24 तासात अवघा 60 मिलिमीटर पाऊस झाला होता. या तुफानी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. रेल्वे मार्गामध्येही पाणी साचल आहे. मात्र तरीही उपनगरी या गाड्या धावत आहे, या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याचे दिसत आहे. आजच्या या जोरदार पावसामुळे पाण्याच्या सखल भागात पाणी झाला आहे वंदना चित्रपटगृह, गजानन महाराज चौक, राम मारुती रोड अशा नेहमीच्या ठिकाणांबरोबरच अगदी महापालिकेसमोरही पाणी साचल्याच दिसत आहे. या पाण्यातूनच पादचारी आणि वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. ठाणे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा ही काम करताना दिसत असून अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या जोरदार पावसामुळे नालेही भरून वाहत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading