ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना पितृशोक

ठाण्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी संतु वाघुले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. संतु वाघुले यांची अंत्ययात्रा सकाळी नऊ वाजता नौपाडा येथील त्यांच्या निवासस्थानातून निघाली आणि ठाणे पूर्व कोपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतु वाघुले वारकरी उपक्रमात सक्रिय होते. सलग पन्नास वर्ष नियमितपणे आळंदी आणि पंढरपूर येथे त्यांचे आवर्जून जाणे होते. संतु वाघुले यांच्या पश्चात मुलगा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, तीन मुली, तीन जावई, दोन सुना आणि आठ नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading