नौपाड्यातील गरजू, गरीब कुटुंबांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक उत्पन्न बेताचे असलेल्या नौपाड्यातील शेकडो कुटुंबांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्डची भेट मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबांची नोंदणी करून गंभीर आजारांवर मोफत उपचारांचा मार्ग खुला केला. नगरसेवक संजय वाघुले यांनी हा उपक्रम राबविला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९७१ गंभीर आजार आणि १२१ पाठपुरावा सेवांवर खासगी तसंच ट्रस्टच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार केले जातात. या उपचारांची रक्कम सरकारकडून भरली जाते. नौपाड्यातील बहूसंख्य गरजू- गरीब कुटुंबांना मोफत उपचार करण्यासाठी विश्वास सामाजिक संस्थेने नागरिकांना जन आरोग्य योजनेचे लाभ देण्याचे ठरविले होते. त्यानुसार नोंदणी करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कार्डचे वाटप केले. या कार्डमुळे शेकडो नागरिकांना मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading