कोरोना संकट काळात जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून कार खरेदीचा प्रस्ताव रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

कोरोना संकटाच्या काळात खर्चात काटकसर गरजेची असताना नव्या कार खरेदीची हौस असलेल्या महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही, तर मनाची लाज तरी बाळगून’ कार खरेदीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

जाहिरात कंपनीचं भलं करण्यासाठी महापौरांनी ठरावात बदल केल्याचा भारतीय जनता पक्षाच्या संजय वाघुलेंचा आरोप

शहरातील मोक्याच्या जागा जाहिरात कंपन्यांना आंदण दिल्या जात असतानाच २३ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत एका जाहिरात कंपनीच्या भल्यासाठी मूळ ठरावात महापौर नरेश म्हस्के यांनी परस्पर बदल केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे.

Read more

संजय वाघुले यांच्या यांच्या कार्यालयाची दोघा अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या रेल्वे स्टेशननजीकच्या कार्यालयाची दोघा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली.

Read more

अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला संजय वाघुलेंचा आक्षेप

अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला महापालिकेनं पायघड्या पांघरल्या असून या कंपनीला पुढील १५ वर्षाच्या काळात १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

बुलेट ट्रेनबाबत महापौरांचे वक्तव्य खोटे, शिवसेनेची दुटप्पी भूमिका – संजय वाघुलेंची टीका

बुलेट ट्रेनला जागा देण्याच्या प्रस्तावावर वेबिनार महासभेत चर्चाही झाली नाही. मात्र संबंधित प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे महापौरांचे वक्तव्य धादांत खोटे आहे. एकिकडे टीएमटी बससाठी केंद्र सरकारकडे निधी मागायचा, पण केंद्र सरकारच्याच बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करायचा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद सुरूच

आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद प्रतिवाद सुरूच असून आता दोघांनी एकमेकांविरोधात पोलीसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

Read more

कोविड रूग्णांसाठीची रूग्णालयं रिकामी असताना दुसरीकडे नवीन कोविड रूग्णालय उभारण्यावर नगरसेवक संजय वाघुले यांचा आक्षेप

कोविड रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या ग्लोबल इम्पॅक्ट हब, भूमिपुत्र हॉस्पिटल रूग्णांअभावी रिकामी असून बुशच्या जागेवरील रूग्णालयातही केवळ ३ रूग्ण असताना व्होल्टास कंपनीच्या जागेवर एका प्रतापी लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी १ हजार ८५ खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

अँटिजन टेस्ट टाळत परराज्यातील शेकडो कुटुंबे ठाण्यात – २४ तास सेंटरची संजय वाघुलेंची मागणी

ठाणे रेल्वे स्टेशनवर सुरू असलेली अॅंटिजन टेस्ट टाळत अनेक रिक्षाचालकांकडून परराज्यातील शेकडो कुटुंबांना परस्पर ठाण्यातील विविध भागात सोडण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कोरोना टेस्टविना शहरात हजारो नागरिक दाखल झाले असल्याचा अंदाज आहे. त्यातून भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन, ठाणे रेल्वे स्टेशनवर २४ तास अॅंटिजन टेस्ट सेंटर सुरू करावे अशी मागणी गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

नगरसेवक संजय वाघुले यांच्या सेवा सप्ताहात नोकरीच्या संधी उपलब्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांनी त्यांच्या प्रभागात सेवा सप्ताह आयोजित केला असून त्यात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Read more

व्होल्टास कोविड हॉस्पीटलच्या निविदेची कोटीच्या कोटी उड्डाणे – संजय वाघुलेंची चौकशीची मागणी

सिडकोच्या निधीतून व्होल्टास कंपनीच्या जागेवर कोविड हॉस्पीटल उभारण्याच्या निविदेच्या कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होणार आहे.

Read more