महेश आहेर यांच्या अडचणी वाढल्या – आनंद परांजपेंनी दिली पुराव्यांची जंत्री

ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावरील अडचणींचा डोंगर अधिकच वाढला आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड यांच्यासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महेश आहेर यांच्याबाबतीत पालिकेकडून झालेल्या अनेक नियमबाह्य गोष्टींचे पुरावेच सादर केले.

Read more

पालकमंत्र्यांना प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा आनंद परांजपेंचा आरोप

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांचे प्रचंड हाल होत असून मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला महापालिका प्रशासनच जबाबदार असून पालकमंत्रीदेखील थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेऊन शांत बसले आहेत. त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांची कोरोनावर मात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी कोरोनावर मात केली आहे.

Read more

घोडबंदर परिसरातील रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

घोडबंदर पट्ट्यात झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बुलेट ट्रेनला विरोध करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही भूमिका मांडली.

Read more

आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू – आनंद परांजपे

ठाणे महापालिका प्रशासनानं सत्ताधा-यांच्या हातचं बाहुलं होऊ नये, गोरगरिब शेतक-यांनी उत्पादित केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे राजन विचारे तर राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांची मोठं शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्रं दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार राजन विचारे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली.

Read more

भारतीय मराठा सेवा प्रतिष्ठानचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर

भारतीय मराठा सेवा प्रतिष्ठाननं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ब्राह्मण असलेल्या आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Read more

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमधील गटबाजी उघड

शिवसेना-भारतीय जनता पक्षाप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी नेहमीप्रमाणेच ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद असल्याचं दिसत आहे.

Read more

थीम पार्क घोटाळ्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी पत्र देण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाण्यातील थीम पार्क घोटाळ्याच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रितसर पत्र द्यावं अन्यथा आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली आहे.

Read more