ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे राजन विचारे तर राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांची मोठं शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्रं दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार राजन विचारे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली. आनंद परांजपे यांच्या समवेत गणेश नाईक, संजीव नाईक, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन नामनिर्देशन पत्र दाखल करताना उपस्थित होते. तर शिवसेनेतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करताना राजन विचारे यांच्या समवेत माजी महापौर अनंत तरे, नंदिनी विचारे उपस्थित होत्या. ठाणे लोकसभा मतदारसंघात आज ७ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत तर आत्तापर्यंत ११ उमेदवारांनी एकूण १६ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ७ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत तर आत्तापर्यंत १४ उमेदवारांनी २५ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading