राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री या दोघांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे एका नेत्याच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे.