महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत

ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती-महिला, अनुसूचित जमाती-महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Read more

१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता करात १० टक्के सूट

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन २०२२-२३ या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून पर्यंत जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read more

लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली.

Read more

विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार – जिल्हास्तरावरील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. जिल्हास्तरावर या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी साधणार जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद

प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत 30 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत.

Read more

दिव्यांशी भौमिकाची मध्य विभागीय स्पर्धेत सुवर्ण कमाई

मावळी मंडळ संस्थेत चालणाऱ्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने इंदूर येथे झालेल्या मध्य विभागीय स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलींच्या गटात पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

Read more

शहरात पाणी साचणाऱ्या सखल भागात महापालिका लावणार साईट पंप आणि पोर्टेबल पंप

पावसाळ्यात शहरातील सखल भागात दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी ठिकठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही आपत्कालीन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीदरम्यान दिली.

Read more

आपत्तीमध्ये समन्वयाने काम करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

पावसाळयामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच नालेसफाई आणि रस्त्याच्या दुरूस्तीची कामे तसेच धोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले, त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

स्वामी विवेकानंद विचार दर्शन फिरते पुस्तकालय प्रदर्शनाचे उदघाटन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांनी बेल्लूर येथे स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पुणे येथील रामकृष्ण मठाने फिरत्या पुस्तकालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय विवेकानंद विचार दर्शन प्रदर्शन उपक्रम आयोजित केले आहे.

Read more