प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी साधणार जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद

प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत 30 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील 43 अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र आणि प्रधानमंत्र्यांचे पत्र देण्यात येणार असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध लाभ देण्यात येतात. या अंतर्गत प्रधानमंत्री सोमवारी देशभरातील अनाथ बालकांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधणार आहेत. यामध्ये 18 वर्षावरील अनाथ मुले हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित असणार असून 18 वर्षाखालील मुले ही वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 43 अनाथ बालकेही या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहेत. या बालकांना आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading