शहरात पाणी साचणाऱ्या सखल भागात महापालिका लावणार साईट पंप आणि पोर्टेबल पंप

पावसाळ्यात शहरातील सखल भागात दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी ठिकठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही आपत्कालीन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीदरम्यान दिली. ठाणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र येथे पावसाळयात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी पंप बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते, त्यानुसार आपत्कालिन विभागाच्या वतीने शहरातील खालील नमूद ठिकाणी साईट पंप तसेच पोर्टेबल पंप बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील विटावा रेल्वे पुलाखाली, सिडको रेल्वे पूल, दादोजी कोंडदेव स्टेडियम, चिखलवाडी, रिव्हरवूड, पोलीस लाईन क्राईम ब्रॅच, पंपीग स्टेशन नं. २, संभाजी नगर आणि देबनार सोसायटी या ठिकाणी साईट पंप बसविण्यात येणार आहे. तर दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, आनंदनगर जिम, दत्तवाडी, भांजेवाडी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आपत्कालीन कक्ष, दशरथ कुटीर सोसायटी माजीवडा प्रभाग समिती, वाघबीळ गाव, लवकुश सोसायटी कोपरी, दाभोळकर चाळ आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी पोर्टेबल पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या काळात महापालिका हद्दीतील विविध भागात पाणी साचल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २५३७१०१० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading