लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली. आज संध्याकाळी ७ च्या सुमारास चंदनवाडी परिसरातील जाई इमारतीमधील लिफ्ट डक्ट मध्ये पडल्याने नारायण बेलोसे यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने बेलोसे यांचा मृतदेह लिफ्टच्या डक्ट रूम मधून बाहेर काढून नौपाडा पोलीस
कर्मचा-यांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
नौपाडा पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार या परिसरात लग्न समारंभ असल्याने उशिरा जेवण करून घरी जात असताना नारायण बेलोसे लिफ्ट डक्ट मध्ये पडले. घरातील सदस्यांनी नौपाडा पोलीस स्थानकात बेलोसे फरार असल्याची तक्रार नोंदवली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading