महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत

ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती-महिला, अनुसूचित जमाती-महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे येत्या मंगळवार सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच बुधवारी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. १ ते ६ जून दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत आणि सूचना महापालिका आयुक्तांकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading