दिव्यांशी भौमिकाची मध्य विभागीय स्पर्धेत सुवर्ण कमाई

मावळी मंडळ संस्थेत चालणाऱ्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने इंदूर येथे झालेल्या मध्य विभागीय स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलींच्या गटात पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तसेच ऍस टेबल टेनिस क्लबचे हे पहिले सुवर्णपदक आहे. ह्या स्पर्धेत तिने उपउपांत्यपूर्व फेरीत काव्या भट्ट, उपांत्यपूर्व फेरीत अवीशा करमरकर ह्यांचा सहज पराभव केला. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिव्याने भारतीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सिंड्रेला दासचा पराभव केला. ह्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अंतिम फेरीपर्यंत अंशुमन रॉय आणि राष्ट्रीय शिक्षक आकाश कासार ह्यांचे मार्गदर्शन लाभले. टेबल टेनिस खेळाच्या सरावासाठी तीचे पालक तिला नियमितपणे कांदिवलीवरून मावळी मंडळ संस्थेत येण्यासाठी जवळपास २ तासांचा रोजचा प्रवास करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading