सावरकरांच्या विरोधातील उद्गारांबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूध्द केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आलं.

Read more

राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा उद्या ठाण्यात विद्यार्थ्यांशी संवाद

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे उद्या ठाण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे ‘कशी होते मतदार नोंदणी ?’ या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read more

कोपरी पूलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार

कोपरी पूलावर गर्डर टाकला जाणार असल्यामुळे या पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार आहे.

Read more

अलिबागमधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळचे प्रणय कमले यांची प्रशिक्षक पदी निवड

ठाण्यातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुमार आणि मुली गटाच्या स्पर्धेकरिता मावळी मंडळचे खो खो संघाच्या ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Read more

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची डॉ. महेश बेडेकर यांची खंत

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Read more

जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका

जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

Read more

२ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना अटक

एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्याची तसंच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन

जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफार नोंदी आता संगणकीकृत होत असून या ई-फेरफार नोंदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी येत्या 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

कल्याणमध्ये 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ठाणे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च- तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

Read more