कोपरी पूलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार

कोपरी पूलावर गर्डर टाकला जाणार असल्यामुळे या पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रविंद्र राठोड यांनी आज कोपरी पूलाची पाहणी केली. गर्डर टाकायच्या कामासाठी हा पूल २ दोन बंद राहणार असून यासाठी पर्यायी मार्ग अवलंबिण्याचं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे. रेल्वे एकूण ७ गर्डर टाकणार असून १ गर्डर हा ११० टनाचा असून त्याची लांबी ६३ मीटर आहे. या गर्डर टाकण्याच्या वेळी संपूर्ण वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त रविंद्र राठोड यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading