फिल्डवर असलेल्या पोलीस आणि पत्रकारांची कोरोना तपासणी साठी टेस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणीला खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली. यात गेल्या 5 दिवसांत 800 पोलीस आणि 200 पत्रकारांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ठाणे महापालिका पत्रकार संघ, उल्हासनगर महापालिका पत्रकार संघ, कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघातील सदस्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तर ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, येथे नाकाबंदीसाठी चौकाचौकात उभे असलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली. उद्यापासून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकात या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. काल या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून ठाणे शहरातील एकूण 38 पत्रकार आणि 2 पोलिसांचे कोरोना तपासणीसाठी SWAB sample collection करण्यात आले आहे. याचा तपासणी रिपोर्ट सोमवारी सकाळी येणार आहे.
ठाणे शहरातील नितीन कंपनी सिग्नल येथे ड्युटीवर असलेल्या आणि सर्दी – ताप लक्षणे असलेल्या दोन पोलिसांची कोरोना तपासणीसाठी SWAB sample collection घेण्यात आले होते. या दोन्ही पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
यापुढील काळातही ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, वन रुपी क्लिनिकचे डॉ राहुल घुले आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading