महापालिकेच्या प्रभागांमध्ये फलक लावून कोरोनाची तपासणी केंद्र कुठे आहेत याचं मार्गदर्शन करण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिका प्रभागात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागातील मोक्याच्या ठिकाणी पालिकेतर्फे फलक लावून कोरोना प्राथमिक तपासणी कुठे उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे.

Read more

जिल्ह्यात आज १ हजार ३४५ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद तर ३८ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज १ हजार ३४५ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३० हजारावर गेली आहे. दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाच्या संसर्गामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत ९८५ जणांचा कोरोनाने जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. ठाण्यात आज ३४१ नवीन रूग्ण तर १४ जणांचा मृत्यू, कल्याण-डोंबिवली ३६९ नवे रूग्ण … Read more

कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घेण्याची नारायण पवारांची मागणी

कोरोनाबरोबरच ठाणे शहरातील विकासकामांच्या चर्चेसाठी तातडीने महासभा घ्यावी अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आज सर्वाधिक रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे आज ३४१ नवे रूग्ण आढळून आले असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक म्हणजे ७५ रूग्ण आढळले तर त्या पाठोपाठ नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत ५९ रूग्ण आढळून आले.

ठाण्यात आज कोरोनाचे ३४१ नवे रूग्ण

ठाण्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज महापालिका क्षेत्रात ३४१ नवे रूग्ण आढळून आले. आजच्या दिवसात ४० जणांना घरी पाठवण्यात आले तर १४ जणांचा मृत्यू झाला.

ठाण्यातील काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

ठाणे महापालिका क्षेत्रात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता काही भागात पुन्हा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

Read more

गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार आणि वाहनचालकांना प्रवेश प्रतिबंधित केला नसल्याचं शासनाकडून स्पष्ट

शासनाने गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार आणि वाहनचालकांना प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही.

Read more

महावितरणची वीज बील तपासणीसाठी लिंक

१ एप्रिल पासून नवीन वीज दर लागू झाले असून आपले बील नीट तपासून पहा आणि मगच महावितरणकडे तक्रार करा असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Read more

ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

Read more