महापालिकेच्या प्रभागांमध्ये फलक लावून कोरोनाची तपासणी केंद्र कुठे आहेत याचं मार्गदर्शन करण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिका प्रभागात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागातील मोक्याच्या ठिकाणी पालिकेतर्फे फलक लावून कोरोना प्राथमिक तपासणी कुठे उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन भीतीचं वातावरण राहणार नाही. तसंच फलकांवर संपर्क क्रमांकही नमूद करावा. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तसंच प्रभागात स्पीकर लावून गाडी फिरवली तर जनजागृती होऊन नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतील असं दत्ता यांनी म्हटलं आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहनाची व्यवस्था करावी यामुळे महापालिका क्षेत्रातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत होईल असं राजीव दत्ता यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading