ठाण्यातील काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

ठाणे महापालिका क्षेत्रात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता काही भागात पुन्हा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. ठाण्यात कोविड संदर्भात अनेक उपाययोजना राबवूनही कोविडचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यानुसार पालकमंत्र्यांकडून हॉटस्पॉटमध्ये कडक अंमलबजावणीच्या सूचनाही प्राप्त झाल्या असून ज्या भागात कोविडचा जास्त संसर्ग आहे अशा भागात हे लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनलॉक १ नंतर अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अशा हॉटस्पॉट असणा-या भागांमध्ये म्हणजे बाळकूम, कोलशेत, ढोकाळा, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, कोपरी, नौपाड्यातील हॉटस्पॉट, किसननगर, शांतीनगर, पडवळनगर, वारलीपाडा, कैलासनगर, रामनगर, सीपी तलाव, इंदिरानगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, कळवा, मुंब्रा आणि कौसा या ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू शकतात असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे. तरी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू सोशल डिस्टंन्सिंग पाळून आणून ठेवाव्यात असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading