महावितरणची वीज बील तपासणीसाठी लिंक

१ एप्रिल पासून नवीन वीज दर लागू झाले असून आपले बील नीट तपासून पहा आणि मगच महावितरणकडे तक्रार करा असं आवाहन महावितरणनं केलं आहे. त्यासाठी महावितरणनं एक लिंक प्रसिध्द केली असून याद्वारे ग्राहकांना आपल्या बिलाविषयीची सविस्तर माहिती मिळू शकेल. आपल्या बिलांवर चालू रिडींग दर्शविले असते तिथे त्याच्या खाली ३१ मार्च पूर्वीचे युनिट काढून दिलेले आहेत आणि तेवढ्या युनिटवर जुने वीज दर लावण्यात आले असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ग्राहकांचे कुठेही नुकसान झालेले नाही किंवा बिल चुकले नाही.
३ महिन्यासाठी ६१२ युनिट वापराचे वीज बिल आले असेल तर ६१२ युनिट आहेत म्हणून ५०० युनिटच्या वरील स्लॅब लागलेला नसतो समजा हा स्लॅब लागलेला असेल तर वीज आकार ७ हजार १६६ रुपये झाला असता.
किंवा ६१२ युनिट भागिले ३ महिने २०४ युनिट प्रति माह असे केले तरी २०४ युनिटला १०० च्या वरील स्लॅब लागलेला नसतो. असे झाले असते तर वीज आकार ४ हजार ५६५ रुपये झाला असता. या दोन्ही प्रकारे वीज आकार ठरत नसून आपण जेवढ्या महिन्यासाठी वापर केला तेवढ्या महिन्यासाठी वीज आकार स्लॅब आणि युनिटमध्ये विभागून दिले जाते.
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन बिलाची सविस्तर माहिती समजून घ्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading