संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क – ठाणेकरानी खबरदारी बाळगण्याचे महापौर, महापालिका आयुक्तांचे आवाहन

पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठाणेकरांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

Read more

सोसायट्यांमधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

कोव्हीड 19 ची सौम्य लक्षणे असलेल्या आणि कसलाही त्रास नसलेल्या रूग्णांना आता सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये क्वारंटाईन करण्याचा आणि त्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

ओवळा माजिवडा प्रभागात आमदार प्रताप सरनाईकांच्या संकल्पनेतून शाखा तेथे दवाखाना

ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रात आमदार प्रताप सरनाईकांच्या संकल्पेतून आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे शाखा तेथे दवाखाना असा हा उपक्रम असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रातील रूग्ण दगावण्याचं प्रमाण केंद्र आणि राज्याच्या तुलनेत कमी – पालिका आयुक्त

ठाणे महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढण्याचं प्रमाण लक्षणीय असलं तरी रूग्ण दगावण्याचं प्रमाण हे केंद्र आणि राज्याच्या तुलनेत कमी असल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेची दुकानदारांसाठी नियमावली

ठाणे महापालिकेनं दुकानदारांसाठी नियमावली तयार केली असून दुकानदारांना सर्व अटी पाळून दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे.

Read more

डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्यावे अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज नवीन १६४ कोरोना रूग्ण सापडले तर ५ जणांचा मृत्यू

ठाणे महापालिका क्षेत्रात आज एकूण १६४ नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले तर २० रूग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता १३६३ झाली आहे. प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रूग्ण १७३९ तर आज ५ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत झालेल्यांची संख्या ९४ इतकी आहे.

चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन
जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Read more

तापसदृष्य लक्षणे जाणवणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

घरोघरी ताप तपासणीमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये तापसदृष्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना केवळ औषधे देवून घरी न पाठवता त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.

Read more