डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्यावे अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपल्या जीवावरील धोका न पाहता जनसामान्यांच्या जीवनासाठी सर्व डॉक्टरांची धडाडी कौतूकास्पद आहे. राज्य सरकारने केवळ एमबीबीएस डॉक्टरांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीएएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांना वगळण्यात आले. या काळातच कंत्राटी तत्वावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीएएमएस डॉक्टरही कर्तव्य बजावत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात कार्यरत डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व डॉक्टरांना न्याय देण्याची गरज आहे असं डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे. समान काम समान वेतन या तत्वावर एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांना समान वेतन देणे गरजेचे आहे. यापूर्वी राज्य सरकारने बंधपत्रित कंत्राटी डॉक्टरांना भरीव वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक कंत्राटी डॉक्टरांना वगळण्यात आले. तरी राज्य सरकारने सहानुभुतीपूर्वक निर्णय घेऊन सर्व डॉक्टरांना समान वेतन देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading