ठाणे महापालिकेची दुकानदारांसाठी नियमावली

ठाणे महापालिकेनं दुकानदारांसाठी नियमावली तयार केली असून दुकानदारांना सर्व अटी पाळून दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे.

शासनानं काही अटींवर दुकानं उघडण्यास परवानगी दिली असून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातही एकल दुकानं तसंच रहिवासी वस्तीतील दुकानांना परवानगी देण्यात आली असून त्यांनी काही नियमांचं पालन करूनच दुकानं सुरू करायची आहेत. त्यासाठी महापालिकेनं एक नियमावलीही तयार केली आहे. दुकानदाराने त्याच्या दुकानातील कर्मचा-यांसाठी सोशल डिस्टंन्सिंग आणि फेस कव्हरबाबत आग्रही असावे. तसंच फेस कव्हर रोजच्या रोज स्वच्छ करावे आणि ते दुस-या कोणीही वापरू नये, प्रत्येक कर्मचारी आणि येणा-या गि-हाईकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. प्रत्येक कर्मचा-याचे आणि येणा-या गि-हाईकाचे टेम्पेरेचर मोजणे अत्यावश्यक आहे. दुकानामध्ये गि-हाईकांमध्ये २ मीटरचं अंतर असावं, मोठ्या दुकानांमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. आणि कर्मचा-यांसाठी फेस कव्हर आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, साबण वापरणे या सर्व गोष्टींकडे दुकान मालकाने लक्ष द्यावे तसंच निर्जंतुकीकरण आणि इतर स्वच्छता ही दर दोन तासांनी करावी, दुकान मालकाने जर कर्मचा-याची तब्येत बरी नसेल तर ताबडतोब त्याला घरी पाठवावे तसंच महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर कळवावे. दुकानात काम करणा-या सर्वांसाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं आवश्यक आहे. तसंच जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करावेत जेणेकरून कोरोना विषाणू पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेर असताना नाक, तोंड आणि डोळ्यांना शक्यतो हात लावू नये, रस्त्यावर कुठेही थुंकू नये, दुकानात रोजच्या रोज साबण आणि पाण्याने स्वच्छता ठेवावी, दुकानातील पडदे, आरसे, टेलिफोन, टेबल्स ही सर्व उपकरणे रोजच्या रोज निर्जंतुक करणं अत्यावश्क असल्याचं ठाणे महापालिकेनं प्रसिध्द केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading