आश्वासन नको प्रत्यक्ष काम सुरू करा – संजय केळकरांची मागणी

पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सात वर्षे लोटली तरी देखील पालघर जिल्हयातील आदिवासी गरीब गरजू लोकांना जिल्हा रुग्णालय नाही. या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

Read more

नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ठाणेकरांचा द्राविडी प्राणायाम

नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाचे माजिवडा लगतच्या भागात रुंदीकरण होत असल्याने राबोडी, बाळकुम, साकेत, रुस्तमजी आदी परिसरातील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यासाठी पर्यायी रस्ता खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

Read more

अनधिकृतला पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त हे एकत्रितपणे मनमानी कारभार करत असून सर्व प्रकारच्या अनधिकृत -अवैध आणि अनियमित गोष्टींना पाठीशी घालत आहेत. नुकत्याच झालेल्या बढती आणि बदल्यांमध्ये अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात संजय केळकर यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

आमदार संजय केळकर यांनी काल विधीमंडळ अधिवेशनात ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले.

Read more

गृहनिर्माण संस्थांवर लादलेल्या अकृषिक कराला स्थगिती

ठाणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात सुमारे सव्वा लाखाहून जास्त गृहनिर्माण संस्था असून या सोसायट्यांवर लादलेला अकृषिक कर स्थगित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली.

Read more

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही – संजय केळकर

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी परतु लागले आहेत. ठाण्यात सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटी आमदार संजय केळकर यांनी घेतली. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी केंद्र सरकार घेत असल्याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली.

Read more

जमील शेख हत्याप्रकरणात हमें इंसाफ चाहीये या मागणीसाठी गृहमंत्र्यांची भेट

गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ राबोडी भागातील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आलेले नाही. याचा तपास अन्य यंत्रणांना देण्यात येऊन ‘हमें इंसाफ चाहीये’, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.

Read more

ठाण्यात भाजपचे वॉर अगेंस्ट टँकरमाफिया

घोडबंदरमधील तीव्र पाणी टंचाईवर अनेक तक्रारीनंतरही उपाय योजना करण्यात येत नसून टँकर माफियांना पोसण्याचे काम सत्ताधारी शिवसेना करीत आहे. या विरोधात आमदार संजय केळकर यांनी वॉर अगेंस्ट टँकरमाफिया ही लोक चळवळ सुरू केली असून केवळ दोन दिवसांत या चळवळीला अडीच हजारहून जास्त नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

Read more

डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर गृहमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश

ठाण्यात नियमबाह्य रात्रभर सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृह सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत तर या प्रकरणी केळकर पुरावेच सादर करणार असल्याने ठाणे पोलिसांचा दिशाभूल करणारा खुलासा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Read more

शिवसेनेने टँकर लॉबीला पोसले – आमदार संजय केळकर यांचा आरोप

न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे ठाणेकरांसाठी पाण्याची व्यवस्था केली नाहीच, उलट सत्ताधारी शिवसेनेने टँकर लॉबीला पोसून ठाणेकरांना पुरेशा पाण्यापासून वंचित ठेवल्याचा स्पष्ट आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

Read more