अनधिकृतला पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त हे एकत्रितपणे मनमानी कारभार करत असून सर्व प्रकारच्या अनधिकृत -अवैध आणि अनियमित गोष्टींना पाठीशी घालत आहेत. नुकत्याच झालेल्या बढती आणि बदल्यांमध्ये अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. नुकतेच अतिक्रमण विभागात वादग्रस्त अधिकाऱ्याची नेमणूक करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना एकप्रकारे पाठबळ देण्याचे काम आयुक्त आणि सत्ताधारी मिळून करत असल्याचा थेट आरोप केळकर यांनी केला आहे. ठाणे हे सांस्कृतिक शहर असून या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनधिकृत बांधकामांचे शहर असा उल्लेख ठाणेकर कदापि सहन करणार नाही. आयुक्तांचा बोलविता धनी कोण आहे? महेश आहेर यांच्या बाबत सफाई कामगारांपासून अनधिकृत बांधकामांविरुद्ध तक्रारी करणाऱ्या अनेक नागरिकांचे आक्षेप असूनही त्यांची नियुक्ती अतिक्रमण विभागात करणे संतापजनक आहे. याबाबत कोणती गोल्डन गॅंग कार्यरत आहे याचा भांडाफोड योग्य वेळी केला जाईल तसेच पुढील काळात वॉर अंगेंस्ट इल्लीगल कन्स्ट्रक्शन ही मोहीम लोकसहभागातून सुरू केली जाईल असा इशारा संजय केळकर यांनी दिला आहे. तसेच ही नियुक्ती आयुक्तांनी रद्द करावी, अशी मागणीही केळकर यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading