युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही – संजय केळकर

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी परतु लागले आहेत. ठाण्यात सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटी आमदार संजय केळकर यांनी घेतली. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी केंद्र सरकार घेत असल्याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली. अद्याप न परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही त्यांनी धीर दिला. रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील भारतीयांनी मायभूमीत परतण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५९ विद्यार्थी हे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असून केंद्राच्या मोहिमेद्वारे हे विद्यार्थी सुखरूप परतत आहेत. केळकर यांनी शहरात परतलेल्या गायत्री सिंग, कार्तिक अगरवाल, प्रियांका शर्मा, नाडर यांच्या भेटी घेत त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी त्यांचे तेथील अनुभव कथन करून सुखरूप भारतात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. पालक आणि विद्यार्थ्यांशी बोलताना संजय केळकर यांनी शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचा विश्वास दिला. तेथील अभ्यासक्रम आणि भारतातील अभ्यासक्रमात फरक असून त्या विद्यापीठाशी संलग्न राहून भारतात उर्वरित शिक्षण पूर्ण करता येईल का किंवा कसे, याबाबत केंद्र सरकार पावले उचलत आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे असं केळकर यांनी सांगितलं. अद्याप परत न आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही भेट घेत लवकरच विद्यार्थी सुखरूप परततील असा विश्वास संजय केळकर यांनी पालकांना दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading