ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात संजय केळकर यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

आमदार संजय केळकर यांनी काल विधीमंडळ अधिवेशनात ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. पॉइंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातुन ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वेतनासंदर्भात प्रश्न उपस्थित करून केळकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सफाई कामगारांना कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही तीन तीन महिने कामगार वेतना पासून वंचित आहेत त्यांना हक्काच्या वेतनासाठी आंदोलने करावी लागतात. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे येथील सफाई कामगारांवर अन्याय होत आहे. शासनाने त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केळकर यांनी केली. या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन केळकर यांच्या मागणीची शासनाने नोंद घ्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी शासनाला दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading