नगरसेवक नारायण पवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जितेंद्र जैन यांचा आरोप

नगरसेवक नारायण पवार आणि त्यांच्या काही सहका-यांनी उथळसर येथील सहाय्यक आयुक्तांच्या दालनात असभ्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जितेंद्र जैन यांनी केला आहे. जितेंद्र जैन हे सरोवर दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे सभासद आहेत. महापालिकेच्या कर भरणा संदर्भात काही कागदपत्रांची मागणी जैन यांनी एका अर्जाद्वारे महापालिकेकडे केली. या अनुषंगानं संस्थेचा ना-हरकत दाखला, महापालिका कर आणि पाणी बील भरणा केल्यानंतर त्यांना कागदपत्रं दिली जातील असं महापालिकेनं कळवलं होतं. त्यावर सर्व संबंधितांची एक बैठक महापालिकेनं बोलावली होती त्यावेळी हा प्रकार घडला. सहाय्यक आयुक्तांसमोरच ही धमकी देण्यात आली. वास्तविक नारायण पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना सुनावणी दरम्यान आगंतुक प्रवेश करून गैरवर्तन केल्यानं याप्रकरणी जितेंद्र जैन यांनी पोलीसांसह पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading