दिवाळीच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव झगमगला पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ऐतिहासिक अशा मासुंदा तलाव सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मासुंदा विद्युत रोषणाईला सुरुवात करून करण्यात आली. मासुंदा तलावाचे सुशोभीकरण आणि सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Read more

जिल्ह्यात सायंकाळी सातपर्यंत सुमारे १५ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत १५ हजार २३८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

‘बिट्टू बॉस’ची आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली भेट

साधारण दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील येऊर जंगलाच्या परिसरात रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते , त्याची त्याच्या आईपासून ताटातूट झाली होती. स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी वन खात्याला बोलावून या बिबट्याला ‘जीवदान’ दिले. त्या बिबट्याला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नेण्यात आले आणि त्याचे पालकत्व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वीकारले होते. त्यावेळी हा विषय खूप चर्चिला गेला होता. ज्यावेळी हे बिबट्याचे पिल्लू मिळून आले होते तेव्हा त्याचे वजन अवघे ३०० ग्रॅम इतके होते. त्याची त्यानंतर घरातील स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेऊन संगोपन करण्यास सुरुवात झाली.

Read more

इंद्रजीत चौकाचे अनावरण

​जगप्रसिद्ध जादूगार इंद्रजीत यांचे ठाणे शहरातील बी-केबीन परिसरात ५६ वर्ष वास्तव्य होते. ठाणे शहरातील सांस्कृतिक व साहित्यिक वर्तुळातही त्यांचा वावर होता. त्यांची स्मृती कायम राहावी, यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या प्रयत्नांतून साठे वाडी येथील चौकाला जादूगर इंद्रजित यांचे नाव देण्यात आले.

बीएसयूपी योजनेतंर्गत 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजनेतंर्गत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

Read more

​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी – राज्य निवडणूक आयुक्त

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

Read more

​उद्या प्रदोषकाळात सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन कराव – पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

आज चतुर्दशी आहे. चतुर्दशी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. त्यामुळे चतुर्दशी ‘ क्षयतिथी ‘ आहे. त्यामुळे आज दिवाळीतील कोणताही सण नाही. उद्या गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी  नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन आहे.

Read more