दिवाळीच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव झगमगला पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ऐतिहासिक अशा मासुंदा तलाव सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मासुंदा विद्युत रोषणाईला सुरुवात करून करण्यात आली. मासुंदा तलावाचे सुशोभीकरण आणि सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
.मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पदपथ सुशोभीकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजीटल चित्रदर्शन, मासुंदा तलावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, खुला रंगमंच, दत्त घाट (गणेश विसर्जन तलाव), ग्लास ट्रान्सपरंट गॅलेरी पदपथ, नाना नानी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पदपथाचे सुशोभीकरण, सेल्फी ‌‍पाँईंट, रंगो बापुजी गुप्ते चौक सुशोभीकरण, अत्याधुनिक आवश्यक विद्युत उद्यानविषयक विविध कामे पूर्णत्वास आली आहेत. या अत्याधुनिक कामांमुळे मासुंदा तलावाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावलौकिक आकर्षण मोठ्या प्रमाणात होईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading