जिल्ह्यात कोरोनाचे १८८ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १८८ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ६७४ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५३५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५३ नवे रूग्ण मिळाले तर १ मृत्यू, सध्या ४०३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३६ नवे रूग्ण, २ मृत्यू तर ३६७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८१९ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३६ नवे रूग्ण १ मृत्यू तर ४२४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९५५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २४ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १२८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ६ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ५७ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ८ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ९ नवे रूग्ण, २ मृत्यू, सध्या ४३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १३ नवे रूग्ण एकही मृत्यू नाही तर १५७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading