बीएसयूपी योजनेतंर्गत 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजनेतंर्गत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांनी या सदनिकाचा विनियोग आपल्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा असे महापौर यांनी यावेळी नमूद केले. दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांना घरे मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करीत महापौरांचे  ठाणे महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले. महापालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरुपी सदनिका उपलब्ध करुन दिलेल्या आहेत, पहिल्या टप्प्यात 180 सदनिकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे 158 जणांना सदनिका देणे प्रलंबित होते. याबाबत आवश्यक ती कार्यवाही दिवाळीपूर्वी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार 158 दिव्यांग बांधवांना कासारवडवली, पडले, ब्रह्मांड, रिव्हरवूड सागर्ली आदी ठिकाणच्या सदनिकाचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading