पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये पत्रकार संघान आंदोलन

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये पत्रकार संघाच आंदोलन

Read more

टीएमटी कर्मचाऱ्यांची १६० कोटीची थकबाकी – टीएमटी एप्लॉईज युनियन घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

ठाणे परिवहन (टीएमटी) सेवेतील कर्मचाऱ्यांची तब्बल १६० कोटींची थकबाकी येणे आहे. सातव्या वेतन आयोगापोटी १२० कोटी थकबाकी असुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे २७ कोटींचे निवृत्ती उपदानही थकीत आहे. तेव्हा, ठाणे महापालिकेच्या आस्थापनेत सामावुन घ्या तसेच थकबाकी द्यावी. या मागण्यांसाठी गुरुवारी टीएमटी एप्लॉईज युनियनच्या झेंड्याखाली शेकडो टीएमटी कर्मचाऱ्यानी एकजुटीचे दर्शन घडवत वागळे आगारात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी थकबाकीसह विविध मागण्यांसाठी येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार असल्याचे सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परिवहन सेवेची सुरुवात फेब्रुवारी १९८९ मध्ये झाली. पण आज टीएमटी अक्षरशः गाळात रुतली असुन महापालिकेच्या अनुदानावरच टीएमटीचा डोलारा उभा आहे. टीएमटीने सादर केलेल्या ५६७.९१ कोटीच्या अर्थसंकल्पात तब्बल ४६० कोटी ५४ लाखांच्या अनुदानाची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने केवळ वेतनापुरतेच अनुदान मंजुर केल्याने टीएमटीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासुनची कोट्यवधीची थकबाकी शिल्लक आहे. या तसेच, ६१३ कर्मचा-यांना कायम करणे,१२ आणि २४ वर्षाच्या आश्वासित वेतन श्रेणीचा लाभ देणे, ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने दंड थोपटले आहेत. टीएमटीमधून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. येत्या काही वर्षात बरेचसे कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यांना दयावयाचे उपदान, सेवानिवृत्ती वेतन आणि रजेचा पगार देणे आवश्यक आहे.

Read more

शहरातील पंधरा तलावांचं लवकरच संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार

आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनतीने उभे केलेल्या ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी उघडे आहे की नाही हे मी मुंबईला येताजाताना पाहणार आहे. ९ ऑगस्ट क्रातीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडवणार, असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. … Read more

घोडबंदर रस्त्यावरील बिकानेर स्वीटसवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई आणि फरसाण ई. अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदाचे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद … Read more

करमुसे आणि शेजारी वाद प्रकरणी दोघांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

करमुसे आणि शेजारी वाद प्रकरणी दोघांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्रीच्या सुमारास अनंत करमुसे आणि त्यांचे शेजारी राहणारे सुनील मिल यांच्यात झटापट झाल्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला असून दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनील मिल यांनी करमुसेनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला असुन करमुसे यांनी सुनिल … Read more

घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमधील एका बारबालेवर यूसूफचा जीव जडला होता. आत्तापर्यंत … Read more

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध जिल्ह्यातील नामनिर्देशित स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सत्कार संबंधित स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानी जावून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने आज ठाणे उपविभागीय अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्य … Read more

कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने

कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली.कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही महसूल सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ.सुरेश … Read more

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त ०९ ऑगस्ट रोजी ठाण्यात आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेतर्फे भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी श्रमिक संषर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, श्रमीक संघटनेचे सुनिल भांगरे, श्रमीक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव … Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये असणाऱ्या क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. हे स्तंभ युवा क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे ज्यांना ब्रिटिशांनी … Read more