कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने

कोकण विभागातील महसूल सप्ताहाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली.
कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही महसूल सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगितीक मेजवानीने झाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ.सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान, अभिनेत्री पूजा हेगडे, गायिका सायली कांबळे आणि अंशिका चोणकर यांची विशेष उपस्थिती लाभली.या महसूल सप्ताह-2023 च्या सांगता समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा होते. तर या कार्यक्रमास मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, माजी विभागीय आयुक्त एस.एस.संधू, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तसेच महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट असे कला सादरीकरणही केले. तसेच सर्वांच्या मनोरंजनासाठी शशांक कल्याणकर आणि सहकारी यांच्या “एक संगीत संध्या” हा वाद्यवृंदाचा सुमधुर कार्यक्रमही सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात स्वतः पद्मश्री डॉ.सुरेश वाडकर, सायली कांबळे आणि कु.अंशिका चोणकर यांनीही आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना अभूतपूर्व असा आनंद दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading