पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये पत्रकार संघाच आंदोलन पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या ल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत मारेकरांना लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.