ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये असणाऱ्या क्रांती स्तंभाला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. हे स्तंभ युवा क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे ज्यांना ब्रिटिशांनी १९१० साली ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली होती. अनंत कान्हेरे यांनी “भारत माता की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी मृत्यूला कवटाळले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी मिट्टी को नमन, वीरोंको वंदन, एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन कारागृहात करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading