घोडबंदर रस्त्यावरील बिकानेर स्वीटसवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई आणि फरसाण ई. अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदाचे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांनी दिली आहे. याअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे,सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती व.रु.आडे यांनी कासारवडवली येथील मिठाई दुकानावर कारवाई केली. घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील बिकानेर स्वीटस मिठाई शॉपची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याबाबतचा अभिलेख सादर केला नाही. तसेच या ठिकाणी अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य, त्वचारोग आणि किंवा तत्सम रोग यापासून मुक्त आहेत किंवा कसे याबाबत खात्री आणि खातरजमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच “उत्पादन” प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीची “पर्यवेक्षक” म्हणून नेमणूक केलेली नाही. या ठिकाणी एकही फोस्टॅक (fostac) प्रशिक्षण झालेला सुपरवायझर नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थाची खरेदी बिले सादर केली नाही. या ठिकाणी अस्थापनेमध्ये अन्नपदार्थाचे विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे, जनहित आणि जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून, उपरोक्त त्रुटींची पूर्तता करीत नसल्याने तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा अंतर्गत या आस्थापनेस विनापरवाना उत्पादन करीत असल्यामुळे व्यवसायासाठी परवाना घेण्यासह तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटीची पूर्तता करेपर्यत बिकानेर स्वीट्स या अन्न आस्थापनेस त्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading