आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त ०९ ऑगस्ट रोजी ठाण्यात आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेतर्फे भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी श्रमिक संषर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, श्रमीक संघटनेचे सुनिल भांगरे, श्रमीक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव आदी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिन हा दिवस खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असल्याने दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते. तसेच राघोजी भांगरे आणि जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading