महापालिका अधिकारी-कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले – आयुक्त

ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले हे सांघिक यश आहे, असे गौरवोद्गार प्रशासक तथा महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी काढले.

Read more

घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण

ठाण्याच्या घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना

यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.

Read more

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकीने उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 30 ऑगस्टपूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Read more

ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा

विश्वातील सर्वात मोठा गणेशोत्सव सोहळा राज्यात साजरा होतो. राज्याचा पर्यटन विभाग आणि ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन महामंडळाने संयुक्तपणे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.

Read more

महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग सुरू

ठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग सुरू झाले आहे. गणेशभक्तांच्या सुविधेकरिता आणि अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता स्लॉट बुकिंग करुन गणेश विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी भाविकांना केले आहे.

Read more

बुधवारी सकाळी ११.२५ ते दुपारी १.५५ पर्यंत गणेश पूजनाचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. जर यावेळेस  गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
ज्येष्ठा गौरी शनिवार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०-५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने  सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८-०५ पर्यंत करावे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या वेळा सकाळी ११-१६ आणि रात्री ११-२७ अशा असून ओहोटीच्या वेळा पहाटे ४-३६ आणि सायं. ५-२२ अशा आहेत.
पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९  दिवस उशीरा  मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

गणेश मूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजना राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळा झाली. यंदाही नागरिकांनी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य, आत्मविश्वास आणि स्व चे मूल्यमापन महत्वाचे – स्वप्नील थोरात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत तसंच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास, स्व चे मूल्यमापन या पाच गोष्टींचा जास्तीत जास्त अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेचे माजी विद्यार्थी स्वप्निल थोरात यांनी व्यक्त केले.

Read more