ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी आज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. गेले दोन वर्ष कोरोनामुळे सणउत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त लागणारी फुलं, फळं, पत्री, गणपतीसाठी केल्या जाणा-या सजावटीचं सामान, पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठ भागामध्ये नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. काल संध्याकाळीही ठिकठिकाणी सार्वजनिक गणपतीचं आगमन होत असल्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. काल गणेशोत्सवा च्या आधीचा रविवार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती त्यामुळे कालही दिवसभर वाहतुक कोंडी झाली होती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading