महापालिका अधिकारी-कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले – आयुक्त

ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले हे सांघिक यश आहे, असे गौरवोद्गार प्रशासक तथा महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी काढले. शर्मा यांनी सपत्नीक महापालिकेच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यंदा कोरोनाचे संकट तुलनेने निवळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना जोशात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांनीही पालिकेतील हा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करावा. तसेच, ठाणेकरांनीही निर्बंधमुक्त सण साजरा करावा, असे आवाहन शर्मा यांनी केले. ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४०वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष, महापालिका आयुक्त यांच्या हस्ते गणेशपूजन झाले

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading