स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य, आत्मविश्वास आणि स्व चे मूल्यमापन महत्वाचे – स्वप्नील थोरात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत तसंच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास, स्व चे मूल्यमापन या पाच गोष्टींचा जास्तीत जास्त अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेचे माजी विद्यार्थी स्वप्निल थोरात यांनी व्यक्त केले. या विशेष व्याख्यानास मुंबई ठाण्यातील विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद देत अशा प्रकारचे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल महापालिकेचे आभार व्यक्त केले. दक्षिण कोरियातील भारतीय दूतावासात वाणिज्य विभागाचे प्रमुख अधिकारी आणि सी. डी. देशमुख या संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले स्वप्निल थोरात यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यूपीएससी आणि इतर संलग्न स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा ? पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल तर त्याचा अभ्यास कसा करावा ? तसेच अभ्यास करताना कोणत्या चुका करु नयेत? अभ्यास करतांना स्वतः च्या नोट्स कशा तयार कराव्यात ? परीक्षेत आलेल्या प्रश्रांना कशा प्रकारे सामोरे जावे ? परीक्षेत आपण उत्तराचे सादरीकरण कशा प्रकारे करावे ? याबाबत परराष्ट्र अधिकारी स्वप्निल थोरात यांनी प्रशिक्षणार्थीना / विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून व्याख्यानाला आलेल्या प्रशिक्षणार्थीशी सुसंवाद साधला. तसेच, सद्य स्थिती दक्षिण कोरिया आणि भारत या देशांमधील जागतिक संबंध कसे आहेत ? याबाबत देखील स्वप्निल थोरात यांनी माहिती दिली. भारतीय नागरी सेवेत परराष्ट्र सेवेला किती महत्त्व आहे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. ठाणे शहरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानाला ठाणे-मुंबईतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading