महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग सुरू

ठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग सुरू झाले आहे. गणेशभक्तांच्या सुविधेकरिता आणि अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता स्लॉट बुकिंग करुन गणेश विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी भाविकांना केले आहे.

कोव्हिड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण करून नागरिकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभतेने करता यावे याकरिता ऑनलाईन स्लॉट बुकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या http://tmc.visarjanslots.com/ वर स्लॉट बुक करता येईल.

संकेतस्थळावर स्लॉट बुकींगची सुविधा २६ ऑगस्ट पासून सुरू झालीअसून सर्व कृत्रिम तलाव व मुर्ती स्विकृती केंद्रांकरिता दुपारी २:०० ते रात्री १०:०० यावेळेतील स्लॉट खुले करण्यात आलेले . आहेत . सदर स्लॉट दिड दिवसाचे , पाच दिवसाचे , गौरी विसर्जन, सात दिवसाचे व अनंत चतुर्दशी दिनी विसर्जनाकरिता उपलब्ध असणार असून त्या त्या दिवसाच्या आदल्यादिवशी रात्री १२:०० वाजता स्लॉट बुकींग बंद होणार आहे .

नागरिकांनी प्राथमिक माहिती व मुर्तीचा प्रकार याप्रमाणे माहिती सादर करून स्लॉट बुक करायचा असून बुकींग झाल्यावर त्यांना क्युआर कोड सह पावती उपलब्ध होईल . सदर पावतीची प्रिन्ट किंवा मोबाईलमधील डिजिटल प्रत विसर्जन स्थळावर सादर करून नागरिकांना सुलभतेने मुर्ती विसर्जन करता येणार आहे. तरी या भाविकांनी विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading