राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकीने उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 30 ऑगस्टपूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने कार्यपद्धती ठरविली आहे. यानुसार, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. पुढील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल/प्लॅस्टीक इ.साहित्य विरहीत), ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इ.समाज प्रबोधन विषयावर देखावा/सजावट, स्वातंत्र्याचा चळवळीसंदर्भातील देखावा/सजावट, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक/आरोग्य /सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/आरोग्य/सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा, पारंपारिक/देशी खेळाच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (पाणी/प्रसाधानगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त इ. बाबींची पूर्तता करणाऱ्या/करु शकणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने स्पर्धेसाठी अर्ज करावेत. यासंबंधीचा अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे www.pldeshandekalaacademy.org हे संकेतस्थळ आणि दर्शनिका विभागाच्या https://mahagazetteers.com संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाचा शासनाकडून पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. प्रथम क्रमांकास पाच लाख रु., द्वितीय क्रमांकास 2.50 लाख आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 प्रमाणे 36 प्राप्त शिफारसीतील गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते मंडळांना वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळाचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading