गणेश मूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजना राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळा झाली. यंदाही नागरिकांनी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महापालिकेने याही वर्षी ठाणेकरांसाठी विशेष पर्यावरणपुरक गणेश विसर्जन व्यवस्था उभारली असून यामध्ये १३ कृत्रिम तलाव, २० मुर्ती स्विकृती केंद्र आणि खाडी किना-यावरील ७ विसर्जन घाटांचा समावेश आहे. सर्व सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता नागरिकांना महापालिकेच्या http://tmc.visarjansiots.com/ वर स्लॉट बुक करता येणार आहेत. नागरिकांनी प्राथमिक माहिती आणि मुर्तीचा प्रकार याप्रमाणे माहिती सादर करून स्लॉट बुक करायचा असून बुकींग झाल्यावर त्यांना क्युआर कोड सह पावती उपलब्ध होईल . सदर पावतीची प्रिन्ट किंवा मोबाईलमधील डिजिटल प्रत विसर्जन स्थळावर सादर करून नागरिकांना सुलभतेने मुर्ती विसर्जन करता येईल. स्लॉट बुकींगची सुविधा २६ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली असून सर्व कृत्रिम तलाव आणि मुर्ती स्विकृती केंद्रांकरिता दुपारी २ ते रात्री १० या वेळेतील स्लॉट खुले करण्यात आले आहेत. हे स्लॉट दिड दिवसाचे , पाच दिवसावे , गौरी विसर्जन, सात दिवसाचे आणि अनंत चतुर्दशी दिनी विसर्जनाकरिता उपलब्ध असणार असून त्या त्या दिवसाच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता स्लॉट बुकींग बंद होणार आहे. स्लॉट बुक न करता देखील नागरिकांना रांगेने विसर्जन करता येणार असून सुविधेकरिता आणि अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता स्लॉट बुकींग करूनच विसर्जन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मुर्तीच्या विसर्जनाकरिता एकूण ७ विसर्जन घाटांच्या ठिकाणी व्यवस्था उभारण्यात आली असून त्याकरिता स्लॉट बुक करण्याची आवश्यकता नाही . सर्व विसर्जन घाट, कृत्रिम तलाव आणि मुर्ती स्विकृती केंद्रांच्या ठिकाणी ठाणे महापालिकेद्वारे विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांकरिता अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अनघा कदम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading